Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज बुधवारच्या दिवशी चंद्र अहोरात्र वृषभ राशीतून भ्रमण होणार आहे. यादरम्यान चंद्र कृतिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीला आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
मेष लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आकस्मिक धनलाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी तुमच्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना अंमलात आणल्या जातील. कलाकारांचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. त्यामुळे मनसुद्धा प्रसन्न असेल.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. कामात अडचणी येऊ शकतात. कामाची गती मंदावेल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०६.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. नोकरीत वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान सुख लाभेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणा वरून हुञ्जत घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. आरोग्यावर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.