Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक मदत मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक मदत मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक मदत मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

May 04, 2024 10:28 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 4 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज चंद्र कुंभ नंतर मीन राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज मंगळ चंद्र संयोगात राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहिल. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०८.

वृषभ: 

आज नेपच्युन चंद्र युतीयोग पाहता करियरमध्ये तुमच्या चपळ कार्य क्षमतेमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उतरवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०३, ०९.

मिथुनः 

आज बुध चंद्र युतीयोगात नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावा तील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नाव लौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्क: 

आज चंद्र अनिष्ट स्थानातून भ्रमण करत असल्याने अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०३, ०९.

Whats_app_banner