मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

May 31, 2024 07:32 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 31 May 2024 : आज शुक्रवारच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे विष्कंभ योग आणि तैतील करणची निर्मिती होत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी कसा जाईल, जाणून घ्या.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : जोतिष अभ्यासानुसार, आज चंद्र कुंभ राशीतून आणि शततारका व पूर्व भाद्रपदा नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. त्याचसोबत आज विष्कंभ योग आणि तैतील करण देखील आहे. या सर्व योगांचा परिणाम मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीवर कसा होणार हे जाणून घेऊया.

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. घरामध्ये सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातून मिळणाऱ्या संपत्ती आणि वास्तुविषयी असलेल्या अडचणी आज संपुष्ठात येतील. तुमच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. अचानक धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशी वृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची पूर्ण शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज शुक्रवारचा दिवस चांगला असणार आहे. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मनमानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. भविष्याच्या दृष्टीने ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज हातात घेतलेल्या कामात यश निश्चित मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज एखादे मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक धनलाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. नोकरीत बढती, पदोन्नतीचा योग आहे. वरिष्ठ मंडळी तुमच्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना अंमलात आणल्या जातील. कलाकारांचा मान सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

WhatsApp channel