Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : सध्या ज्येष्ठ महिना सुरु असून आज सप्तमी तिथी आहे. गुरुवारच्या दिवशी सप्तमीचा चंद्र कुंभ राशीतून आणि शततारका नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.आजच्या या शुभ चंद्रभ्रमणात मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
मेष राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पना शक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना आजचे व्यवहार लाभदायक ठरतील. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. मात्र मीपणा आणि अहंकारी वृत्ती बाजूला ठेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना वरिष्ठांसमोर नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०२, ०४.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. कटकटी निर्माण करणारे योग तयार होत आहेत. व्यवसायिकांची आर्थिक फसवणुक होण्याची दाट शक्यता आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. घरासंबंधी समस्या उद्भवू शकते. विनाकारण कोणाशीही वाद घालू नयेत. जवळच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता राहिल. आज कोणत्याही क्षेत्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. लक्ष्मीची अवकृपा राहिल. त्यामुळे पैशांची चणचण भासेल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०७, ०९.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आज वैधृती योगात दिवस चांगला असणार आहे. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. अनेक दिवसांपासून सुरु असलेले स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तीशी संबंध प्रस्थापित होतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ओढा राहिल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काहीसा समाधान लाभेल. तुमच्या नव्या कल्पनांना साथीदारांचा पूर्ण पाठिंबा लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापार-व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. तुम्हाला विनाकारण झालेल्या वादामधून नुकसान सहन करावा लागेल. वाद टाळणे हितावह होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.