Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज चंद्र धनु राशीनंतर मकर राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
आज साध्य योगात मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. घरात शुभकार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.
आज प्लुटोशी होणारा योग पाहता अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज प्लुटो-चंद्र योगात विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. आपणास आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. गृहस्थी सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.
आज चंद्रबल उत्तम असल्याने नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील.
शुभरंग: भगवा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.