Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज बुधवार २९ मे २०२४ रोजी, चंद्र अहोरात्र मकर आणि कुंभ राशीत असून श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. तर दुसरीकडे धनिष्ठाकारंभ सकाळ पासुन सुरू होत आहे. या सर्वांमध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात यश मिळेल. आज तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ प्रभावी होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या घडतील. आणि त्यामुळे मन खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. मात्र काही ठिकाणी तुमच्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तितके लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक स्थिती काहीशी बिघडेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मन सतत चिंताग्रस्न राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे किंवा देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्यबाबतीत विशेष काळजी घ्यावी.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीनादेखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना इतरांसमोर नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसर्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
कर्क राशीसाठीसुद्धा आजचा दिवस चांगला असणार आहे. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. मनमोकळा संवाद होईल. परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता आधीपेक्षा वाढणार आहे. कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०६.
संबंधित बातम्या