Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज चंद्र धनु राशीत भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
आज शुक्राशी होणारा शुभ योग पाहता आर्थिक बाबतीत आकस्मिक लाभ होतील. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहिल. भाग्यकारक घटना घडतील. शत्रूला पूर्णपणे कोंडीत प्रहार करण्यावर तुमचा भर राहील. तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.
आज सिद्ध योगात नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज अनिष्ट चंद्रबल योग असल्याने प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत रागावर नियंत्रण ठेवा. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्या. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. कुटुंबापासुन दूर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.
आज सिद्ध योगात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात मंगल कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.