Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज जोतिष अभ्यासानुसार ब्रह्मा योग आणि गरजकरण योगाची निर्मिती होत आहे. शिवाय आज चंद्र आणि केतूच्या साहाय्याने नवमपंचम योगसुद्धा घटित होत आहे. आजच्या या गरजकरण योगात मंगळवारचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार याबाबत जाणून घ्या.
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. मात्र आज कमाईपेक्षा खर्च अधिक होईल. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. अचानक प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखकांचे लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०६.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. महत्वाच्या कार्यात कोणावरही विसंबून राहू नका. अथवा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कामामध्ये वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तुम्हालाही सहकार्य लाभेल. अनेक दिवसांपासून रखडलेली जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त महागडी खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. सामाजिक कार्यात विशेष रुची दाखवाल. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०९.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज अविचाराने कर्ज काढू नका. अथवा हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्यादृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
संबंधित बातम्या