मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांना परदेशवारीची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांना परदेशवारीची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

May 26, 2024 09:22 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 26 May 2024 : आज रविवार २६ मे २०२४ रोजी, चंद्र मंगळशी युती करत असल्याने नवमपंचम योग घटित होत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

आजच्या दिवशी चंद्र मंगळशी नवमपंचम योग करीत आहे. त्यातूनच लक्ष्मीयोग घटित होत आहे. शिवाय आज चंद्र अहोरात्र धनु राशीतून आणि शुक्राच्या नक्षत्रातून संक्रमण करणार आहे.आज शुभ योग आणि बव करण योगसुद्धा आहे. या सर्व योगांमध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.

मेष

आज मेष राशीच्या लोकांना तब्येत थोडी नरमगरम जाणवेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी येणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. शासकीय कार्यात सत्ताधारी प्रशासनाकडून सहकार्य लाभेल. सामाजिक स्तरावरील परीवर्तन आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत चिंतीत रहाल. घरातील वातावरण मात्र खेळीमेळीचे असेल. महत्वाच्या कामात घरच्या लोकांचा पाठिंबा मिळणार आहे.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०८.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती कराल. अचानक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. शुभकार्यात सहभागी व्हाल. समाजात मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

शुभरंगः भगवा शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०९.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. आळस दुर ठेवा. मित्रपरीवाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातून लाभ होईल. परदेशभ्रमणाची शक्यता आहे.

शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०५.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर कामे पूर्ण कराल. यशाची चव चाखण्यासाठी अतोनात कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणि मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०३, ०९.

WhatsApp channel