Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : जोतिष शास्त्रानुसार, आज चंद्र अहोरात्र वृश्चिक-धनु राशीतून बुधाच्या राशीमध्ये आणि जेष्ठा व मूळ नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. तसेच आज सिद्ध आणि साध्य योग तर वणिज करण असणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या हालचालींमध्ये आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा असणार हे जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीशी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण निर्माण होईल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. त्यामुळे शुल्लक कारणांसाठी दिवसभर चिडचिड कराल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्यादृष्टीने मात्र काहीशी तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भागीदारीच्या व्यापारात फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आजचा दिवस पाहता मिथुन राशीच्या लोकांनी व्यवसायात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक त्रासामुळे वादविवाद होतील. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी-अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मन सतत चिंताग्रस्त राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे किंवा देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामात हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. शासकीय सेवेतील मंडळीनादेखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नोकरीत नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून पाठिंबा मिळेल. कोणत्याही प्रकरणात दुसर्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०७, ०८.
संबंधित बातम्या