Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज शुक्रवारच्या दिवशी विविध योगांची निर्मिती होत आहे. आज चंद्र राहू आणि नेपच्यूनशी नवमपंचम योग करीत आहे. तसेच शिव व सिद्धी योग जुळून आले आहेत. तैतील करणात आज शुक्रवारचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा असणार आहे हे जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या चीज वस्तू सांभाळणे आवश्यक आहे. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची दाट शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. कोणाशीही विनाकारण वाद घालू नये. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणूक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. आजच्या दिवशी वाहन जपून चालवा. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०६, ०८.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र-आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसे दुरावली जातील अशी वर्तणुक टाळावी. नव्या योजनांवर काळजीपूर्वक काम करावे लागेल. संततीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी पुन्हा रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी दिवस अशुभ आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते.एकंदरीत वृषभ राशीच्या लोकांना आज काळजीपूर्वक पाऊले टाकण्याची शक्यता आहे.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०६, ०९.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. तुमच्याबाबत इतरांना थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाची सांगड घातली तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. विवाहित पुरुषांना पत्नीच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम स्वतःकडे घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
कर्क राशीच्या लोकांना आज आपल्या लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. सतत अविचारीपणाने वागणे योग्य नाही. कोणत्याही बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्याविषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासून त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळा.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०१, ०७