Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज गुरुवार बुद्धपौर्णिमेचा दिवस आहे. तसेच आज कूर्म जयंतीसुद्धा आहे. आजच्या दिवशी विष्णू देवाची कूर्म रूपातील पूजा करण्यात येते. दरम्यान आज रवि- गुरु शुक्राशी प्रतियोग करीत आहे. या सर्व हालचालींमध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घ्या.
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्यांचे वर्चस्व मान्य करावे लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. प्रेमवीरांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त परदेशवारी होऊ शकते.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०६.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक व्यवहारासाठी काळ अनुकूल आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. सरकारी संदर्भातील व्यक्तींनादेखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारासोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहेत. मानसिक समाधान लाभल्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०६.
मिथुन राशीचे लोक आज अध्यात्मिक विकास साधतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक वेग आणि नेमकेपणा राहिल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहक्काने धन आणि संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यांसारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.
कर्क राशीच्या लोकांसाठी आज निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०३, ०७.