Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चैत्र शुक्ल पौर्णिमेचा चंद्र कन्या राशीनंतर सिंह राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
आज मंगळाचं राशीपरिवर्तन पाहता अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
आज शनि मंगळ संयोग पाहता व्यापारात काहीबाबतीत अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. उद्योगक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाही. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज मंगळाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणीं कडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित कामकाजा साठी दिवस चांगला राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. रोजगारात अत्यंत महत्वपूर्ण कामात सावधानतेने पाऊल उचला. कामात उत्साह वाढणार आहे.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. व्यापारात आर्थिक हानी घडण्याची शक्यता आहे. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. प्रवास आवश्यक असल तरच करा. नोकरीत कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.