Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : जोतिष शास्त्रानुसार आज अनेक योग जुळून येत आहेत. आज बुधवारी चंद्र विशाखा नक्षत्रातून आणि तूळ राशीतून भ्रमण करत असल्याने नवपंचम योग तयार होत आहे. शिवाय आज विषयोग आणि गरजकरण योगसुद्धा घटित होत आहे. या सर्व हालचालींमध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांनी आज कोणत्याही कार्यात खोट्याचा किंवा नको त्या गोष्टीचा आधार घेऊ नये. अशा गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.
आज नवपंचम योगात वृषभ राशीचे लोक दुसऱ्यांना मदत करण्यात पुढे राहतील. तुमच्या स्वभावाने वातावरणात चैतन्य निर्माण करु शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. घरात कौटुंबिक सुखशांती आणि आनंददायक वातावरण राहिल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.
शुभ चंद्रभ्रमणात आज तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास बसेल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत इतरांवर विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
आज कोणत्याही प्रसंगांना धीटपणे सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. क्रीडा क्षेत्रात करियर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यवहारात नोकरीत देवाणघेवाणीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०१, ०५
संबंधित बातम्या