Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : जोतिष अभ्यासानुसार आज चंद्र रवि, गुरु आणि शुक्राशी षडाष्टक योग करीत असल्याने राजयोग आणि गजकेसरीयोग घटित होत आहे. तसेच आज चंद्र तूळ राशीतून संक्रमण करणार आहे. त्यामुळे अहोरात्र स्वाती नक्षत्र आणि गरजकरण राहील. ग्रह-नक्षत्रांच्या या सर्व हालचालींचा सकारत्मक आणि नकारात्मक परिणाम राशींवरसुद्धा पडणार आहे. यामध्ये आज मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा असणार हे जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांसाठी आज जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाप्रती सजग रहा. आळस दूर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातून लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या समजदार वृत्तीमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. इतरांच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेणे टाळा. अथवा नुकसान होऊ शकते. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने आनंदी आणि उत्साही राहाल. त्यामुळे समोर आलेल्या अडचणींवर धैर्याने मात करण्यात यशस्वी व्हाल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०७, ०८.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. कुटुंबात स्नेहभाव वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर आज नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा ठरणार आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नाव लौकिकता प्राप्त होईल. नोकरीत तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्यासाठी योग्य राहतील. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. मनात असलेल्या इच्छा आकांक्षा आज पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वास जाणवेल. कामाच्या ठिकाणी नव्या आणि जबाबदाऱ्या मिळतील. संध्याकाळच्या वेळी सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.
शुभरंगःपांढरा, शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०६.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आज संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे. त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. कोणत्याही क्षेत्रातील लोकांनी सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. जमीनीच्याच्या देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी मात्र वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे. अचानक अडचणीचे प्रसंग आले तरी त्यातून धैर्याने बाहेर पडाल.
शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०२, ०५.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यवसायिकांना व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मात्र मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून अभ्यासात प्रगती होईल. खाजगी आयुष्यात मात्र चढ-उतारांचा सामना करावा लागेल. एखाद्या क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी मात्र आजचा दिवस उत्तम आहे. ही गुंतवणूक येत्या काळात दुप्पट फायदा देणारी ठरेल. प्रत्येक कामात आज जोडीदाराची साथ मिळणार आहे. त्यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०६.
संबंधित बातम्या