मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : मिथुन राशीच्या लोकांनी काळजीपूर्वक व्यवहार करा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : मिथुन राशीच्या लोकांनी काळजीपूर्वक व्यवहार करा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 02, 2024 10:50 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 2 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र गुरूशी संयोग करीत असल्याने आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. बेकारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०६, ०९.

वृषभ: 

आज शुक्ल योगात शुभ फलदायी घटना घडणार आहेत. सरकारी नोकरीतल्या लोकांना मान मरातब प्रमोशन मिळण्याचे योग येतील. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संतती कडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात सफलतापूर्वक यश मिळेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज तैतील करणात घरासंबंधी समस्या होऊ शकते. कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. बुद्धीचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. आपल्या चीज वस्तू सांभाळणे आवश्यक आहे. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

कर्क: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नाव लौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०५, ०८.

WhatsApp channel