Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : राशीभविष्यानुसार कोणताच दिवस कोणासाठी सारखा नसतो. कधी कोणासाठी सकारत्मक तर कधी नकारात्मक स्वरुपाचा असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलांचा परिणाम या राशींवर दिसून येतो. या बदलावरुनच भविष्य ठरत असते. आज चंद्रावर शनिचा दृष्टीयोग तर मंगळाशी युतीयोगही होणार आहे. अशात आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा असणार हे जाणून घ्या.
मेष राशीसाठी आज संमिश्र दिवस आहे.अती संवेदनशील स्वभावामुळे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात थोडा सुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीत राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. दुसऱ्यावर अति विश्वास ठेवू नका.
शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०६.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करावे लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. व्यसनी मित्रांपासून दुर राहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघडणार नाही याकडे लक्ष द्यावे.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना काम केल्याचे समाधान मिळेल. तरुणांना प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रामध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक आणि मानसन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०९.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी निर्माण होईल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणीमध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
संबंधित बातम्या