Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज रविवारी मोहिनी एकादशी साजरी केली जात आहे. तसेच आज चंद्र कन्या राशीतून आणि हस्त नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
आज मोहिनी एकादशीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. महत्वाच्या कार्यात योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. तुमच्यामुळे कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दयावे लागेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. घरामध्ये एखादी मोठी वस्तू खरेदी कराल. जोडीदारासोबत संवाद साधून नाते मजबूत करण्यासाठी वेळ उत्तम आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. विविध मार्गाने ज्ञान प्राप्त करुन इतरांशी शेअर करण्यासाठी धडपड कराल. आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वीदेखील व्हाल. रविवार असल्याने कुटुंबासोबत वेळ घालवाल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज अजिबात करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडपणावर नियंत्रण ठेवा.आज वाहन जपून चालवा अथवा दुखापत होऊ शकते. आज विविध मार्गाने तुम्हाला समस्या येत राहतील. त्यामुळे मनाची नाराजी वाढेल. मात्र आज रविवारी कुटुंबासोबत असल्याने मनःशांती लाभेल. घरामध्ये एखाद्या नव्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. तुमच्यासाठी आजचा दिवस कठीण असला तरी कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढणार आहे. त्यामुळे थोडे समाधान लाभेल.
शुभरंगः भगवा शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दूर करून परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जा. तुम्हाला यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात चांगला विस्तार होईल. काही घटना मनाप्रमाणे घडल्याने मन उत्साही राहील. मात्र तुम्हाला स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात धनलाभ होऊ शकतो. सायंकाळच्या वेळी धार्मिक रुची वाढेल.आणि त्यामुळे एखाद्या धार्मिक ठिकाणी वेळ घालवाल.
शुभरंगः हिरवा शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०९.
कर्क राशीच्या लोकांनी आज खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दयावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. तसेच जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग जुळून येत आहे. वेळेचा अपव्यय टाळा. कामानिमित्त झालेल्या प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांचे विवाह आज जुळून येऊ शकतात. नातेवाईकांशी संवाद होऊन नातेसंबंध सुधारु शकतात. संध्याकाळी मित्रांसोबत गाठीभेटी होतील. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल.
शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०६, ०८.
संबंधित बातम्या