Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीला वारसा हक्काने होणार धनलाभ! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीला वारसा हक्काने होणार धनलाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीला वारसा हक्काने होणार धनलाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Published May 16, 2024 09:38 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 16 May 2024 : चंद्राचा गुरु आणि बुधसोबत नवपंचम योग जुळून येत आहे. हा योग काही राशींसाठी फायदेशीर तर काही राशींसाठी नुकसानकारक ठरणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

आज गुरुवार १६ मे २०२४ रोजी चंद्र सिंह राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे चंद्राचा गुरु आणि बुधसोबत नवपंचम योग जुळून येत आहे. हा योग काही राशींसाठी फायदेशीर तर काही राशींसाठी नुकसानकारक ठरणार आहे. पाहूया या योगाचा मेष,वृषभ, मिथुन आणि कर्क राशीवर कसा प्रभाव पडतो.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. उद्योग-व्यवसायात निर्धारित वेळेत काम पूर्ण होईल अशी काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावर मालमत्तेच्या देवाणघेवाणीचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे मानसिक त्रास जाणवेल. मुलांबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे पेचात पडाल. त्यांच्या करिअरसंबंधी चिंता वाटत राहील. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. आज कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०८.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला आता मिळेल. नोकरीत इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल. सत्ताधारी प्रशासन यांच्याकडून सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर भर द्या. इतरांना जितका मानसन्मान द्याल. तितकाच तुम्हाला त्यांचा फायदा मिळणार आहे. तब्येतीबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुमच्या सकारात्मक स्वभावाकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०९.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटुंबातील सद्स्यांचे तुमच्याविषयी चांगले मत असेल. महत्वाची कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. एखाद्या शुभकार्यात सामील व्हाल. समाजात मानसन्मान मिळेल. मनासारखे यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवमपंचम योग पाहता राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढल्याने असमाधान निर्माण होईल. वारसा हक्काने धनलाभ होण्याची शक्यता आहे. कमी कष्टात जास्त पैसा मिळण्याची कला अवगत होईल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०५.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. आळस दुर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. परदेशभ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. वैचारिक दृष्टिकोनातून अनेक कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी प्राप्त होतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०६.

Whats_app_banner