Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चैत्र शुक्ल अष्टमीचा चंद्र कर्क राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
आज नेपच्युन-चंद्र नवमपंचम योगात व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. कडक बोलण्याने लोकांची मने दुखावली जातील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्या साठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.
आज चार ग्रहांशी होणारा चंद्रयोग पाहता धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नाते वाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.
आज बुध चंद्र योगात स्थिती लक्षात घेता कार्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चागला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०९.
संबंधित बातम्या