Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र आश्लेषा नक्षत्रा मार्गे मघा नक्षत्रातून प्रवास करत आहे, तसेच कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यापारीवर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. संततीविषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ होईल.आज चंद्र शनिशी युती करीत आहे. स्वतःला शक्य होईल असेच काम स्वीकाराल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभाग समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी देईल.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस ताणतनावाचा असेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. कुटुंबापासुन दुरावा निर्माण होईल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. आज कोणतीही मोठी गुंतवणूक करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृतीवर विशेष लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्तताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकांच्या कारवायात वाढ होईल. व्यवसायात देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. इतरांशी वाद घालू नका. खाजगी आयुष्यात मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात धैर्य आणि संयमाने व्यवहार करा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा.
शुभरंग: पांढरा शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०६.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या अंमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी दिवस उत्तम आहे. आरोग्य उत्तम राहील. वृद्धी योगात आज घरात मंगलकार्य घडतील. व्यवसायात नवा भागीदार जोडण्याचा विचार कराल. जास्त भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकरिता आनंदी दिवस आहे. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.
कर्क राशीच्या लोकांनी आज आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणीसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.आज शनिशी होणारा योग पाहता आपणास शुभ अशुभ दोन्ही परिणाम पाहायला मिळतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे . तुमची स्थिती उत्तम होईल. प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य. शुभअंकः ०४, ०७.