मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope : वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 15, 2024 09:36 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 15 April 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चैत्र शुक्ल सप्तमीचा चंद्र मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्राचं बलं चांगलं लाभल्याने आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल. 

शुभरंग: केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०६.

वृषभः 

आज सुकर्मा योगात ग्रहमान अनुकूल आहेत. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंद दायक बातम्या मिळतील. आर्थिक स्थिती समाधानकारक झाल्यामुळे निवांत रहाल. मोठे प्रवासाचे योग येतील. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. 

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्कः 

आज प्लुटो-चंद्र योगात अपेक्षित कार्य पूर्ण करण्या साठी कसरत करावी लागेल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. फटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०६, ०९.

WhatsApp channel