Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीसाठी परदेशगमनाचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीसाठी परदेशगमनाचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : कर्क राशीसाठी परदेशगमनाचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

May 14, 2024 08:47 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 14 May 2024 : आज चंद्र आणि गुरु गजकेसरी योगाची निर्मिती करत आहेत. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज १४ मे २०२४ रोजी चंद्र संक्रमण करणार आहे. चंद्र आज कर्क राशीतून आणि पुष्य व अश्लेषा नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व मुलांसोबत संबंध चांगले राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.चंद्र अनुकूल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम कराल. आकस्मिक धनलाभाचा योग जुळून येत आहे. व्यापारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक फायदा होईल. व्यवसायात भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०८.

वृषभ

वृषभ राशीसाठी आज दिवस संमिश्र असेल. अध्यात्मिक रुची वाढेल. सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रपरिवारामध्ये वेळ घालवाल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आज दिवस काहीसा त्रासदायक ठरणार आहे. कामामध्ये उर्जा कमी राहिल. जवळच्या व्यक्तीच्या भरवशावर राहिलात तरी लाभ मिळणार नाही. मानसिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रसंग येतील. व्यापार व्यवसायात विरोधकांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना त्रासदायक होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०७.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मानधनात वाढ होईल. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मानसन्मान पदवी अथवा पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मित्रमैत्रिणीमधील वादविवाद संपुष्टात येतील. जवळच्या व्यक्तींचा मनोरंजन करण्याकडे कल राहील. तसेच आज प्लुटो-चंद्र संयोगात मनाला समाधान लाभेल अश्या अनेक घटना घडतील. भावंडांकडून सहकार्य लाभेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आध्यात्मिक रुची वाढून धार्मिक कार्ये घडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल.

शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०५.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला उत्तम आध्यात्मिक सुख मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील.आज चंद्रबल उत्तम राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य.शुभअंकः ०४, ०६.

Whats_app_banner