Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज गुरुवारच्या दिवशी राशीचक्रातील बाराही राशींवर ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा परिणाम दिसून येणार. त्यामुळेच आजचा दिवस कोणासाठी अत्यंत खास असणार तर कोणासाठी सामान्य असणार. शास्त्रानुसार आज सप्तमीचा चंद्र अहोरात्र सिंह राशीतून आणि पुर्वा फाल्गुनी नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणात आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार ते पाहूया.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशनात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमच्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. स्वतःच्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. आयुष्यात नवे काही करण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.
आज व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाने त्रासून जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
तुम्हाला आज आर्थिक विवंचना थोडी सतावेल. आपल्या चीज वस्तू सांभाळणे आवश्यक आहे. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची दाट शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास जाणवेल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानकारक असण्याची शक्यता आहे. विनाकारण कोणाशीही वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.
आज जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी महागडी खरेदी करण्याचा मूड राहील. अनेक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. आज मोठी आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे.संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.
संबंधित बातम्या