Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज रविवार १२ मे २०२४ रोजी आज रविवारी ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे धृती योग आणि शूल योगाची निर्मिती होत आहे. अशात मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे योग्य ठरेल. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या व्यवसायात एकमेकांशी पटणे कठीण होईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल.
शुभरंगं: तांबडा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणीमध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात भागीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. धार्मिक-अध्यात्मिक कार्यांत रुची वाढेल. कुटुंबातील सदस्य महत्वाचा सल्ला घेतील. त्यांच्या मनात तुमच्याबाबत आणखी आदर वाढेल.
शुभरंगः भगवा शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
मिथुन राशीसाठी आज रविवारचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. सुप्त कलागुणांना वाव द्याल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना अंमलात आणू शकाल. उद्योग-व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा दिवस आर्थिक उन्नती करणारा ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. समाजात प्रतिष्ठा वाढीस लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
शुभरंगः पोपटी शुभदिशाः हिरवा, शुभअंकः ०३, ०६.
आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणांसाठी चांगले वातावरण राहिल. तुमच्या आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येईल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. अती संवेदनशील स्वभामुळे थोडा तापटपणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे कुटुंबातील लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०५.
संबंधित बातम्या