Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलामुळे विशिष्ट बदल घडून येतात. या बदलांनाच योग किंवा तिथी म्हणतात. या योगांचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होत असतो. अशात आजचा दिवस कोणाला फायद्याचा ठरणार तर कोणाला नुकसानीचा. कोणाला नव्या संधी उपलब्ध होणार तर कोणाच्या हातातून आलेल्या संधी निसटू शकतात. या सर्व बाबींचे अंदाज आपण राशीभविष्याच्या माध्यमातून लावू शकतो. अशातच आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.
तुमच्या प्रेमळ आणि मर्यादाशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तितके लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक त्रास वाढून मतभेद होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्त मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्यबाबतीत विशेष काळजी घ्यावी.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०६.
घरामध्ये शुभ कार्य घडून येतील. व्यवसाय असणार्यांना आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील. परंतु तुमच्या मताशी मुले सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव लोकांवर राहिल. स्वतःच्या मनाने विचार करुनच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
आयुष्यात झालेले बदल जितक्या लवकर आत्मसात कराल तितका यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन किंवा घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे लागेल. पराक्रम, क्षमतेमुळे यश तर मिळेलच पण फायदाही होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मानसन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.
संबंधित बातम्या