मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांनी वेळेचा अपव्यय टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांनी वेळेचा अपव्यय टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 12, 2024 09:39 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 12 April 2024 : राशीचक्रातील पहिल्या ४ राशी मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क
मेष, वृषभ, मिथुन, कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज आज विनायक चतुर्थीचा चंद्र वृषभ राशीत संक्रमण करत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा रमजान ईदचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्राच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमण विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसाया निमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

वृषभः 

आज चंद्र केतु नवमपंचम योगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका हेलपाट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मना प्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०६.

मिथुनः 

आज चंद्राचं बल चांगलं लाभल्याने कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यापार व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील.कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

कर्कः 

आज ग्रहयोग अनुकूल आहेत. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०३, ०७.

WhatsApp channel