मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीसाठी लक्ष्मी-नारायण योग ठरणार शुभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : मिथुन राशीसाठी लक्ष्मी-नारायण योग ठरणार शुभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 11, 2024 09:45 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 11 May 2024 : आज मेष राशीत शुक्र आणि बुधाची युती तयार झाली आहे. त्यामुळे लक्ष्मी-नारायणासारखा शुभ योग जुळून येत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज ११ मे २०२४ रोजी शनिवारी चंद्र बुध ग्रहाची महत्वाची राशी मिथुनमध्ये संक्रमण करणार आहे. तर दुसरीकडे मेष राशीत शुक्र आणि बुधाची युती तयार झाली आहे. त्यामुळे लक्ष्मी-नारायणासारखा शुभ योग जुळून येत आहे. तसेच आज बुद्धी देवता समजल्या जाणाऱ्या श्रीगणेशाची विनायक चतुर्थीदेखील आहे. या सर्व शुभ योगांचा परिणाम मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीवर कसा होणार याबाबत जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज या राशीतील लोकांची धाडशी वृत्ती पाहायला मिळेल. उद्योग-व्यवसायाचा विस्तार होईल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. मनाविरुद्ध गोष्टी घडत असल्याने तुमची मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ ठरतील. कामात असंतोष जनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग येतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या वी लागेल. स्वभावात राग निर्माण होईल. त्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस थोडासा चढ-उत्तरांचा असणार आहे. जोडीदारासोबत मतभेद निर्माण होतील. त्यामुळे मन उदास राहील. मुलांकडून अपेक्षाभंग झाल्याने त्रस्त राहाल. आज पैशांची देवाणघेवाण शक्यतो टाळावी. आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. मोठे व्यवहार किंवा आर्थिक उलाढाली यात फसगत होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादाशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. व्यवसायाच्यादृष्टीने आजचा दिवस मध्यम असणार आहे. फारसा आर्थिक लाभ मिळणार नाही.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विनायक चतुर्थी आणि लक्ष्मी-नारायण योगाचा लाभ  या राशीला भरभरुन मिळणार आहे. आज उद्योग-व्यापारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ  होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना मनासारखे यश मिळेल. मन प्रसन्न असल्यामुळे आरोग्य उत्तम राहिल. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. परंतु यश लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. मनमोकळ्या संवादातून जवळीकता वाढेल.  विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात यश मिळेल. अचानक आलेल्या खर्चामुळे तारांबळ उडू नये यासाठी मात्र आधीच पैशांची तरतूद करावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बौद्धिक क्षमतेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या घडतील. आरोग्य उत्तम राहिल्याने मन प्रसन्न राहील. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. घरातील व्यक्तींशी मतभेद  शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे समजून घेण्याचा करा. त्यामुळे वादविवाद होणार नाहीत.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel