Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज पंचमीचा चंद्र अहोरात्र कर्क व सिंह राशीतून आणि आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे आज मंगळ रुचक राजयोगाची निर्मिती करत आहे. या योगामध्ये आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेणार आहोत.
आजच्या दिवशी स्वतःच्या प्रतिष्ठेने होतील तितकी कामे पूर्ण कराल. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्यादृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. अतिउत्साह आणि अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. समाजात मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भागीदारीच्या व्यापारात फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.
व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक प्रगती होऊन आराधनाही चांगली होईल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशीबाची साथ लाभणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तुमच्या हातून आध्यात्मिक, सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल. परमेश्वरावर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
कार्यक्षेत्रात छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्या. मानसिक स्थिती थोडीशी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाईगडबड करु नका. अथवा आर्थिक नुकसान होऊ शकते.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेर गावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. तुमच्या व्यक्तीमत्वाचा उत्तम प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. एखाद्या योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्यत पत्नीकडून सहकार्य लागेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. तुमच्यासाठी दिवस शुभ आहे.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०७, ०८.