Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मंगळाच्या राशीतुन तसेच शुक्राच्या नक्षत्रातुन संक्रमण करत आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
आज गजकेसरी योगात आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार तेजीत राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसोबत सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
आज विष्कंभ योगात आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ राहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. उद्योग व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहील. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्राचा हर्शलशी संयोग होत असुन नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. परदेशगमनाचे योग येतील. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभणार आहे.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
आज राशीस्वामी चंद्र आणि गुरू संयोग होत असल्याने आपणास अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
संबंधित बातम्या