मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : खर्चाला अनेक वाटा फुटतील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : खर्चाला अनेक वाटा फुटतील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 09, 2024 09:53 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 9 february 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini
Aries Taurus Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज ९ फेब्रुवारी शुक्रवार रोजी, मौनी अमावस्येचा चंद्र स्वनक्षत्रातुन भ्रमण करीत आहे. मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज अमावस्येचा चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत असताना घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०८.

वृषभ: 

आज चंद्राच पाठबळ लाभल्याने कामाच्या ठिकाणी उत्तम परस्पर संबंध निर्माण करण्यावर भर द्या. दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल. तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्याकडून सहकार्य लाभेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०९.

मिथुनः 

आज चंद्र आणि चार ग्रहांच्या संयोगात राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०५.