Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवसी अस्त मंगळाचा उदय होणार असून, बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करतोय. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी दिवस कसा राहील. वाचा राशीभविष्य.
आज अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.
आज अनुराधा नक्षत्रातील चंद्राचं भ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०७, ०८.
आज आपल्या राशीनुसार अनिष्ट स्थानातून चंद्रगोचर होत असल्याने घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०५.