मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष राशीसाठी अडचणीचा तर वृषभ व मिथुन राशीसाठी फायदेशीर दिवस! वाचा राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष राशीसाठी अडचणीचा तर वृषभ व मिथुन राशीसाठी फायदेशीर दिवस! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 08, 2024 09:41 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 8 february 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

mesh vrishabh mithun
mesh vrishabh mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज ८ फेब्रुवारी गुरुवार रोजी, शिवरात्री, त्रयोदशीचा चंद्र गुरू आणि शनिच्या राशीतून भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज गुरू चंद्राच्या प्रभावात कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात राहण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०७.

वृषभ: 

आज सिद्धी योगात काही भाग्यदायक घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनेचं स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०१, ०५.

मिथुन: 

आज राशीस्वामी बुध शुभस्थानात असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०६.