Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन कामकाजास उत्तम दिवस! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन कामकाजास उत्तम दिवस! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन कामकाजास उत्तम दिवस! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Feb 07, 2024 09:52 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 7 february 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini
Aries Taurus Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज ७ फेब्रुवारी बुधवार रोजी, प्रदोष दिनी चंद्र अहोरात्र गुरूच्या राशीतुन आणि शुक्राच्या नक्षत्रातुन भ्रमण करतोय. मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज चंद्रबल मिळाल्याने नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभ: 

आज मंगळाच्या राशीतुन होणार चंद्रगोचर पाहता कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. निजी जीवनात मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणा वरून हुञ्जत घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०६.

मिथुनः 

आज शुभ योगात घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.

Whats_app_banner