Mesh Vrishabh Mithun horoscope today : भाग्यदायक घटना घडतील! वाचा तिन्ही राशीचे भविष्य-mesh vrishabh mithun horoscope today 6 january 2024 aries taurus gemini rashi prediction in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : भाग्यदायक घटना घडतील! वाचा तिन्ही राशीचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : भाग्यदायक घटना घडतील! वाचा तिन्ही राशीचे भविष्य

Jan 06, 2024 09:47 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 6 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी शनिवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

mesh vrishabh mithun
mesh vrishabh mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज चंद्र शनिशी नवमपंचम योग करीत असुन, मंगळाच्या नक्षत्रातुन गोचर करणार आहे. आजच्या दिनमानावर अनुक्रमे चंद्र मंगळ आणि शुक्राचा प्रभाव राहील. वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज वणिज करणात काही भाग्यदायक घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कामानिमित्त केलेल्या दुरवरच्या प्रवासा तून लाभ होतील.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०६.

वृषभ: 

आज राशीस्वामी शुक्र शुभस्थानात असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील. मनात उत्साह राहील.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०५.

मिथुनः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अत्यंत शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्टया मुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहिल. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

Whats_app_banner