Mesh Vrishabh Mithun horoscope today : अनावश्यक चिंता पाठलाग करतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य-mesh vrishabh mithun horoscope today 4 january 2024 aries taurus gemini rashi prediction in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : अनावश्यक चिंता पाठलाग करतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : अनावश्यक चिंता पाठलाग करतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 04, 2024 08:59 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 4 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी गुरुवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Mesh, Vrishabh, Mithun Rashi
Mesh, Vrishabh, Mithun Rashi

Mesh Vrishabh Mithun horoscope today : चंद्र कन्या राशीत संक्रमण करत असून, सूर्योदयानंतर शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करेल. तसेच राशींना मंगळ आणि सूर्याच्या संयोगाने तयार झालेल्या मंगल आदित्य योगाचाही आज लाभ मिळेल. वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज चंद्र-गुरू-हर्षल प्रतियोगात तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कलेच्या आणि संगणक क्षेत्रात असणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र-मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटेल. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

वृषभ: 

आजच्या चंद्रभ्रमणात कोणत्याही परिस्थितीचा भेद करून तुमच्या पुढे येण्याच्या इच्छेला पूरक वातावरण लाभेल. तरीसुद्धा अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगाला तोंड द्यावे लागेल. चंद्र-बुध योगात व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.

मिथुन: 

आजचं चंद्रबल विचारात घेता कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.