Mesh Vrishabh Mithun horoscope today : काळजी घेण्याचा दिवस! मेष, वृषभ व मिथुनचे राशीभविष्य वाचा-mesh vrishabh mithun horoscope today 31 december 2023 aries taurus gemini rashi prediction in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : काळजी घेण्याचा दिवस! मेष, वृषभ व मिथुनचे राशीभविष्य वाचा

Mesh Vrishabh Mithun horoscope today : काळजी घेण्याचा दिवस! मेष, वृषभ व मिथुनचे राशीभविष्य वाचा

Dec 31, 2023 07:00 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 31 december 2023 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीचं आजचं भविष्य जाणून घ्या.

mesh vrishabh mithun
mesh vrishabh mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज दिवसं-रात्र चंद्र सिंह राशीतुन गोचर करणार आहे. वर्षाचा शेवटचा व सुट्टीचा दिवस प्रीति योगात मेष, वृषभ, मिथुनसाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज चंद्राचा तिन ग्रहांशी योग होत असुन चंद्रावर शनिची पुर्ण दृष्टी आहे. बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहिल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

वृषभः 

आज चंद्र प्रतियोगात असल्याने आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्तीची फारकत होतील. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

मिथुनः 

आज राशीस्वामी बुध लाभदायक आणि चंद्र भ्रमण शुभ स्थानातुन होत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करियर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

Whats_app_banner