मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष व मिथुन राशीसाठी मान-सन्मानाचा दिवस, वाचा तिन्ही राशीचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष व मिथुन राशीसाठी मान-सन्मानाचा दिवस, वाचा तिन्ही राशीचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 03, 2024 08:35 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 3 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी बुधवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini
Aries Taurus Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : वक्री बुध मार्गी होत असुन चंद्र कन्या राशीत संक्रमण करत आहे आणि रवि आणि बुधासोबत संयोग साधत आहे. अशात मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा असेल नववर्षाचा पहिला बुधवार, वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज उत्तम ग्रहमान असल्याने वास्तु खरेदीचा योग आहे. दिवसाची सुरुवात अनेक सकारात्मक गोष्टींनी होईल. भरपूर आर्थिक लाभ होईल. घरामध्ये चांगले वातावरण असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात येईल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धन लाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीच्या तक्रारी उद्भभवतील.

शुभरंग: नांरगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभ: 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. आज काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. अतिरिक्त खर्च टाळावा आणि किरकोळ आजारांनाही गांभीर्याने घ्यावे. सोशल मीडिया चित्रपट यामध्ये मौल्यवान वेळ वाया घालवू नये. काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दिनचर्येत ध्यान योगा आणि व्यायामाचा समावेश अवश्य करावा. कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज ग्रहयोग अनुकूल परिणाम देणारं ठरेल. परदेशाशी संबंधित कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी करण्यास किंवा अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिकां साठी अनेक संधी निर्माण होऊ शकतात. संधी ओळखून पुढे जावे लागेल. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्र ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०५.