मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष राशीच्या लोकांनी मानसिक स्वास्थ सांभाळा! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष राशीच्या लोकांनी मानसिक स्वास्थ सांभाळा! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 29, 2024 09:22 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 29 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी सोमवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini
Aries Taurus Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २९ जानेवारी सोमवार रोजी चंद्र सिंह राशीत संक्रमण करत असून, संकष्ट चतुर्थी आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरी निमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

वृषभ: 

आज बुधाशी होणारा चंद्राच्या योग पाहता कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.