Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीला पद प्रतिष्ठा लाभेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीला पद प्रतिष्ठा लाभेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीला पद प्रतिष्ठा लाभेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Jan 28, 2024 10:33 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 28 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी रविवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

mesh vrishabh mithun
mesh vrishabh mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २८ जानेवारी रविवार रोजी चंद्र सिंह राशीत संक्रमण करेल. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज शुक्र केतुच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात काही महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावामुळे कधीकधी नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीन राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल.

शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

वृषभ: 

आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल.व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा.कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज चंद्राशी होणारा शुभ ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.

Whats_app_banner