Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २६ जानेवारी शुक्रवार रोजी गणराज्य दिनी चंद्र स्वराशीतून संक्रमण करत आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.
आज प्रीती योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये असलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याची शक्यताआहे. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.
शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.
आज चंद्र शुक्र शुभयोगामुळे आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल.जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. मंगळाच्या प्रभावामुळे अनुकुलता जाणवेल. सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्राचं अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.