मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीसाठी आनंदाचा गुरुवार! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीसाठी आनंदाचा गुरुवार! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 25, 2024 08:52 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 25 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी बुधवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

mesh vrishabh mithun
mesh vrishabh mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २५ जानेवारी गुरुवार रोजी शाकंभरी पौर्णिमेचा चंद्र स्वराशीतून आणि शनि व गुरूच्या नक्षत्रातून गोचर करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज चंद्र आर्थिक बाबतीत अनुकुल असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशग मनाच्या संधी येतील. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०७.

वृषभः 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. अचानक धन लाभाच्या कोणत्याही मार्गाला न जाणेच इष्ट ठरेल. शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. नेहमीपेक्षा घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. लहान-सहान कारणावरून रागाचा पारा चढल्यामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. अन्यथा अडचणी वाढतील.

शुभरंग: भगवा शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.

मिथुन: 

आज गुरूचं नक्षत्र अनुकुल राहिल. मित्र मंडळींच्या सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु तेथे मात्र निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील तरी कामे व्यवस्थित पार पाडण्याकडे कल राहील. त्यासाठी आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धरून ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.