चंद्र शनि प्रतियोगात असल्यानं आरोग्य जपा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. वडीलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. बेशिस्तपणा वाढू शकतो. नियोजन गडबडेल. व्यवसायिकांना अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरून मानसिक भीती वाटेल. प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात तणाव येईल. एकमेकांच्या वागण्याचा मानसिक त्रास होईल. कोर्टकचेरीच्या नादी लागू नका. प्रवासात काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना घडतील. शुभ रंग: केसरी शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०४, ०६.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र लाभदायक आहे. चंद्र भ्रमण शुभ स्थानातून होत आहे. घरात नवीन वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. मुलांच्या करियर संबंधी आर्थिक तरतूद करण्यावर लक्ष द्याल. तुम्ही मांडलेल्या नव्या कल्पनांचं कुटुंबीयांकडून स्वागत होईल. स्पर्धकांवर मात करण्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना सावध राहा. नाती, मैत्री बळकट होईल. साहित्यिक व कलाकारांना नवनिर्मितीची संधी मिळेल. कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील कल्पना पूर्णत्वास येतील. नवीन मित्र जोडले जातील. वेळेचं व्यवस्थापन नीट करावं लागेल. फसव्या योजनांपासून दूर राहा. शुभ रंगः सफेद शुभ दिशाः आग्नेय. शुभ अंकः ०२, ०७.
चंद्र आणि इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. नवीन कल्पनांचं स्वागत होईल. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यशाचा आनंद मिळेल. इच्छाआकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. शेअर बाजारातील अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरात कामाच्या वस्तू खरेदीचा योग आहे. जोडीदाराचा सल्ला आणि त्याचा अधिकार मान्य करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांवर अचानक खर्च करावा लागेल. खेळाडूंना अपेक्षित यश मिळेल. गाडी चालवताना काळजी घ्या. शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०६.
संबंधित बातम्या