Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज सोमवार रोजी चंद्रदेव मंगळाच्या आणि शुक्राच्या राशीतुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.
आज चंद्रबल उत्तम असल्याने दिवस उन्नतीकारक आहे. मनात उर्जा आणि सकारात्मना वाढेल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लागेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.
आज अमृत योगात नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज मंगळ-चंद्र योग हा कलह उत्पन्न होणारा योग आहे. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत रागावर नियंत्रण ठेवा. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्या. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.