Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज रविवार रोजीपुत्रदा एकादशीचा चंद्र शुक्राच्या राशीतुन आणि रोहिणी ह्या मालकीच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.
आज अनिष्ट चंद्रभ्रमणा मुळे आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यापार व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. व्यवहार करताना जपून करावेत. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे.
शुभरंग: तांबडा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
आज चंद्र शनि षडाष्टक योगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. समाजकारणाची आवड असल्यामुळे जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
आज शुक्ल योगात व्यापारात अती उत्साही पणाने निर्णय घेऊ नका. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजी पणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०९.