Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २१ फेब्रुवारी बुधवार रोजी, भीष्मद्वादशी आणि प्रदोष दिनी चंद्र गुरू आणि शनिच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
आज चंद्रभ्रमण प्रतिकूल परिणाम देणारं आहे. लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणतेही संशोधन चांगले कराल. खोट्याचा किंवा नको त्या गोष्टीचा आधार मात्र घेऊ नका. अशा गोष्टी तुम्हाला गोत्यात आणू शकतात.कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.
आज चंद्रबल लाभल्याने आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.
आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असल्याने आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करवून घ्याल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
संबंधित बातम्या