अमृत योग असल्यामुळं आज ग्रहमान अनुकूल आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. दूरच्या प्रवासाचा योग आहे. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. तरुणांसाठी काळ अत्यंत अनुकूल असून नवनव्या संधी चालून येतील. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यांच्यासाठी ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. अधिक कष्ट करावे लागतील. जबाबदारीनं काम करा. वेळेचं योग्य नियोजन केल्यास त्याचा उत्तम फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कौटुंबिक सुख लाभेल. मुलांकडून आनंददायक बातम्या मिळतील. शुभ रंग: भगवा शुभ दिशा: दक्षिण. शुभ अंकः ०४, ०८.
चंद्र गोचर आज अनुकूल राहील. मनाविरुद्ध काही घडले तरी सकारात्मक विचारामुळं उत्साह वाढेल. खासकरून संसारी लोकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असेल. व्यवसायात फायदेशीर आर्थिक व्यवहार करता येतील. प्रवासाचे योग आहेत. जुन्या मित्राची भेट होईल. तुमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी उत्साहानं व जोमानं प्रयत्न करत राहा. अपेक्षित यश मिळेल. शेअर बाजारात कमी कालावधीची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना किंवा पैसे गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नका. संततीकडून सर्व प्रकारे आनंददायक बातम्या मिळतील. शुभ रंग: सफेद शुभ दिशा: आग्नेय. शुभ अंकः ०२, ०७.
आज चंद्रबल शुभ असल्यानं व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. परस्परांशी सुसंवाद राहील. मनाविरुद्ध प्रवासाला जावं लागेल. तब्येत सांभाळा. हजरजबाबी स्वभावामुळं लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणी आपणास पुन्हा भेटण्याचा योग आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मनमिळावू राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०६.
(jaynews21@gmail.com)
(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)
संबंधित बातम्या