मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : फायद्याचे प्रमाण वाढेल, प्रगती कराल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : फायद्याचे प्रमाण वाढेल, प्रगती कराल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 20, 2024 09:50 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 20 february 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

Mesh Vrishabh Mithun
Mesh Vrishabh Mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २० फेब्रुवारी मंगळवार रोजी, जया एकादशीचा चंद्र गुरूच्या नक्षत्रातून आणि बुधाच्या राशीतुन गोचर करणार आहे. मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करत रहाल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमी जनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी रहाल. तरुणांच्या अती आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबा तील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.

वृषभ: 

आज चंद्र भ्रमणातून शुभ फलदायी घटना घडणार आहेत. तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. या कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज बव करणात अविचाराची लक्ष्मणरेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्म विश्वास उत्तम असल्या मुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.