Mesh Vrishabh Mithun horoscope today : वक्री बुध मार्गी होत असुन चंद्र रविच्या आणि बुधाच्या राशीतुन गोचर करत आहे. अशात मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा असेल नववर्षाचा पहिला मंगळवार, वाचा राशीभविष्य!
आज चंद्र रवि बुधाशी योग करीत आहे. आपला राशीस्वामी मंगळ उत्तम स्थितीत आहे. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभाग समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.
आज चंद्रबल अनिष्ट अशुभ परिणाम देईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वैचारिक भेदामुळे कौटूंबिक नात्यामध्ये दूरी येण्याचे योग आहेत. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.
आज राशीस्वामी बुध मंगळाशी संयोग करतोय. संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.