मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : वृषभ राशींच्या लोकांनी मनावर संयम ठेवावा! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : वृषभ राशींच्या लोकांनी मनावर संयम ठेवावा! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 02, 2024 09:55 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 2 february 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini
Aries Taurus Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज २ फेब्रुवारी शुक्रवार रोजी, कालाष्टमीचा चंद्र शुक्राच्या राशीतुन भ्रमण करणार असून, मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज गुरू-हर्षलशी होणारा योग पाहता काही लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आपल्या स्वभावातील दूरदर्शीपणामुळे कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वास्तु बाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संतती करिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज दीर्घकालीन गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

वृषभः 

आज कालाष्टमी दिनी विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता अभ्यास करावा. काम आणि दाम यांचे गणित जमवता जमवता वैयक्तिक जीवनात त्याचे पडसाद खोलवर उमटतील. एखादा निर्णय तडका फडकी घेण्यापासून सावधान राहा. वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे मिळाले तरी खर्चही तसेच वाढणार आहेत. मनमानी पणे काम करण्याच्या पद्धती मुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे करण्यास प्रतिकुल दिवस असल्याने शक्यतो टाळा. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आजचं चंद्रभ्रमण पाहता मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळीवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. साथीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगती कारक आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.